April 21, 2026 9:32 pm

सिद्धार्थ आठल्ये 100 पर्सेंटाइल मिळवत जेईई मेन मध्ये प्रथम

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे, दि. 20 एप्रिल 2026 : पुण्यातील नामांकित कोचिंग संस्था बाकलीवाल ट्युटोरियल्स (BT) ने जेईई मेन (JEE Main) च्या निकालात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपली भक्कम छाप कायम राखली. 20 एप्रिल रोजी सायंकाळी जाहीर झालेल्या निकालात, बीटी चा विद्यार्थी सिद्धार्थ आठल्ये याने 100 पर्सेंटाइल मिळवत पुणे शहरात प्रथम क्रमांक पटकावला. त्याला ऑल इंडिया रँक 25 प्राप्त झाला असून, या यशामुळे संस्थेचा आणि शहराचा गौरव वाढला आहे.

सिद्धार्थ आठल्ये हा इयत्ता आठवीपासून बीटी मध्ये शिक्षण घेत असून, त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आणि मार्गदर्शनाला हे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी जेईई मेन 2025 मध्येही बीटीच्या आयुष चौधरी याने 100 पर्सेंटाइल मिळवत महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवले होते. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी बीटी ने हा मानाचा तुरा पटकावला आहे.

यंदाच्या निकालात बीटीच्या 15 विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया टॉप 1000 मध्ये स्थान मिळवले असून, 33 विद्यार्थी टॉप 2000 मध्ये आणि 85 विद्यार्थी टॉप 5000 मध्ये झळकले आहेत. तसेच अनेक विद्यार्थी 17 मे 2026 रोजी होणाऱ्या जेईई ऍडव्हान्स 2026 साठी पात्र ठरले आहेत.

या यशाबद्दल बोलताना संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर वैभव बाकलीवाल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, “विद्यार्थ्यांची कठोर मेहनत, समर्पण आणि आमच्या शिस्तबद्ध व लक्ष केंद्रीत शिक्षण पद्धतीचे हे फलित आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेचा सर्वोत्तम विकास करणे हेच आमचे ध्येय आहे. जेईई ऍडव्हान्ससाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”

सखोल संकल्पनात्मक शिक्षण, अनुभवी शिक्षक, नियमित चाचण्या आणि वैयक्तिक मार्गदर्शन या घटकांच्या बळावर BT ने अनेक वर्षांपासून जेईई मेन आणि जेईई ऍडव्हान्स परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम ठेवली आहे. संस्थेने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!