April 23, 2026 3:27 pm

*महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राज्यभरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त अनेक भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी मंदिरात जात आहेत. यामुळे प्रत्येक मंदिरात भाविकांची मांदियाळी जमली आहे.

मात्र या उत्साहाला गालबोट लावणारी दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे.

पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील हरिश्चंद्र गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महाशिवरात्री निमित्त हरिश्चंद्र गडावर दर्शनासाठी हजारो भाविक दरवर्षी दर्शनासाठी खिरेश्र्वर बाजूने हरिश्चंद्र गडावर पुरातन शिवशंकर मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. रविवारी महाशिवरात्रीनिमित्त हरिश्चंद्र गडावर दर्शनकरून खाली उतरताना कड्यावरून निसटलेला दगड लागून एक भाविक गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.

नेमके काय घडले?

सुरेश किसन डामसे (वय ४५, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे ठार झालेल्या भाविकांचे नाव आहे. सुरेश हे दर्शन आटोपून जुन्नर दरवाज्याकडील पायवाटेने खाली उतरत होते. यावेळी कड्यावरून एक मोठा दगड अचानक निसटून त्यांच्या डोक्यावर कोसळला. गंभीर जखमी झाल्याने ते घटनास्थळीच बेशुद्ध पडले.

दरम्यान, ही बातमी समजताच स्थानिक नागरिक व जुन्नर रेस्कु टिम सदस्य आणि इतर भाविकांनी तत्काळ मदत करून त्यांना हरिश्चंद्र गडावर कठीण पायवाटेने छोळी करून गडावरून खाली उतरून आणले. या घटनेमुळे दामसे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गडावर मोठी गर्दी असल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कड्यावरून सैल दगड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!