April 23, 2026 3:28 pm

*दुचाकीचा धक्का लागल्याने खून तिघांना अटक

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

दुचाकीचा धक्का लागल्यामुळे तिघा हल्लेखोरांनी दोघा भावांवर प्राणघातक हल्ला केला. त्यात एकाचा खून झाला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नांदगावपेठ महामार्गावरील सर्व्हिस रोडवर ही घटना घडली.

गौरव सुधाकर घोटेकार (वय ३४, रा. अंजनगावसुर्जी, अमरावती), असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, असे नांदगावपेठचे पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांनी सांगितले. मृत व्यक्तीचा भाऊ सौरभ सुधाकर घोटेकर (वय ३०, रा. अंजनगावसुर्जी) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांच्याच तक्रारीवरून नांदगावपेठ पोलिसांनी संशयित आदेश रघुनाथ तेलमोरे (वय २५), दीप ऊर्फ यशोदीप विनायक वेलकर (वय २५) व रोहित संजय तायडे (वय २३, रा. महादेवखोरी, अमरावती) या तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही पोलिसांनी खुनाच्या घटनेनंतर काही तासांतच अटक केली.

सौरभ व गौरव घोटेकर हे दोघे भाऊ असून, ते नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये रेमंड शोरूममध्ये नोकरीला आहेत. नांदगावपेठ परिसरात भाड्याच्या खोलीत ते राहतात. बुधवारी (ता. ११) दोघेही भाऊ एमएच २७ बीजी ७०५८ क्रमांकाच्या दुचाकीने परिसरातील हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर आपल्या खोलीवर जाण्यास निघाले. नांदगावपेठ टोलनाक्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर गतिरोधक आल्याने सौरभ व गौरव घोटेकर यांनी दुचाकीचा वेग कमी केला. त्याचवेळी त्यांच्या मागून अन्य दुचाकी आली.

त्या दुचाकीने सौरभ व गौरव घोटेकर हे दोघे भाऊ जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते दोघेही पडता पडता बचावले. धक्का देणाऱ्या दुचाकीवरील संशयित आदेश तेलमोरे, दीप ऊर्फ यशोदीप वेलकर व रोहित तायडे या तिघांनी खाली उतरून शिवीगाळ केली. त्यांना गौरव व सौरभ यांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी शिवीगाळ व मारहाण केली. त्यापैकी आदेश तेलमोरे याने चाकूने गौरव याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याने तो खाली कोसळला. हाणामारीत सौरभसुद्धा जखमी झाला आहे. डॉक्टरांनी तपासणीअंती गौरव घोटेकर याला मृत घोषित केले. क्षणिक वादातून हत्येची घटना घडली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून संशयित तीनही हल्लेखोरांना अटक केली. -दिनेश दहातोंडे, पोलिस निरीक्षक, नांदगावपेठ, अमरावती.

तिघांविरुद्धही गुन्हे दाखल नांदगावपेठ परिसरात ज्या तिघांनी दोघा भावांवर प्राणघातक हल्ला करून एकाची हत्या केली. त्यातील आदेश तेलमोरे याच्याविरुद्ध हत्येचा तर त्याच्या सोबत असलेल्या अन्य दोघांविरुद्धही मारहाण, गंभीर दुखापत करण्यात सारखे गुन्हे दाखल आहेत, असे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!