April 19, 2026 8:10 pm

*’एअर इंडियाचं विमान जाणूनबुजून पाडलं , तपासात आतापर्यंतचा धक्कादायक खुलासा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमान दुर्घटनेच्या चौकशीदरम्यान एअर इंडियाचं विमान हेतूपूर्व पाडण्यात आलं असा निष्कर्ष तपासकर्त्यांनी काढला आहे.

ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे झाली नव्हती तर जाणूनबुजून केलेल्या कृत्याचा परिणाम होती, असं इटालियन दैनिक Corriere della Sera यांनी नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील झालेल्या चर्चेच्या आधारे सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. मात्र, डीजीसीएने अद्याप याप्रकरणी कोणताही अधिकृत अहवाल दिलेला नाही. त्यामुळे हा अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वी काहीही निष्कर्ष काढणे अकाली ठरेल.

रिपोर्टनुसार, भारतीय तपासकर्त्यांनी 12 जून 2025 रोजी इंजिनमध्ये इंधन पुरवठा बंद झाल्यानंतर झालेला अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला नव्हता तर जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे झाला होता असा निष्कर्ष काढला आहे. अधिकारी आता त्यांचा अंतिम अहवाल तयार करण्याची तयारी करत आहेत. चौकशीत मदत करणाऱ्या अमेरिकन तज्ज्ञांनी या निष्कर्षांचे वर्णन “एक मोठं यश” असं केलं असल्याचं वृत्तपत्राने म्हटलं आहे.

एअर इंडियाद्वारे चालवले जाणारे बोईंग 787 ड्रीमलाइनर अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच कोसळलं. या दुर्घटनेत एकूण 260 लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विमानातील प्रवासी आणि विमान ज्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर पडले तेथील काहींचाही समावेश होता. या विमान दुर्घटनेतून फक्त एकच प्रवासी वाचला.

जुलै 2025 मध्ये भारताच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरोने (AAIB) ने अहवाल प्रसिद्ध केला होता. यावेळी प्राथमिक अहवालात एका पायलटने इंधन नियंत्रण बंद केल्याच्या कथित घटनेचा उल्लेख होता. कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये एका पायलटला विचारताना ऐकू आलं की, “तुम्ही (इंधन) का बंद केलं?” दुसऱ्याने उत्तर दिलं, “मी तसं केलेलं नाही.”

इटालियन वृत्तपत्राने या अहवालाचा उल्लेख केला आहे. तसंच याचा आधार घेत म्हटलं आहे की, तपासकर्त्यांना एका पायलटने इंजिन इंधन नियंत्रण स्विच बंद केले, ज्यामुळे विमानाची पॉवर गेली आणि ते जमिनीवर कोसळले असं वाटत आहे. कॅप्टन सुमित सभरवाल हे पायलट-इन-कमांड होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर हे सह-पायलट होते.

“नेमकं जबाबदार कोण हे अजूनही अस्पष्ट आहे. मुख्य संशयित कॅप्टन सुमीत सभरवाल नैराश्याने ग्रस्त होता हे दुर्घटनेच्या महिन्याभरानंतर उघडकीस आलं,” असं रिपोर्टमध्ये लिहिलं आहे.

एएआयबीच्या प्राथमिक निष्कर्षांनंतर सभरवालच्या वडिलांनी आरोप फेटाळून लावले होते. त्यांनी नव्याने चौकशीची मागणी केली आणि मुलाच्या मानसिक आरोग्याबद्दलच्या दाव्यांना नकार दिला होता. घटस्फोट आणि वैयक्तिक समस्यांमुळे चिंता किंवा नैराश्य असल्याचा दावे त्यांनी फेटाळले. वैमानिक संघटनेनेही याचा निषेध केला होता.

Corriere della Sera नुसार, अंतिम तपास अहवालात वैमानिकांचे सतत मानसिक मूल्यांकन आणि मानसिक आरोग्य देखरेखीबाबतच्या शिफारशींचा समावेश असण्याची अपेक्षा आहे. दुर्घटनेनंतर काही आठवडे तांत्रिक बिघाडापासून ते मानवी चुकांपर्यंत अनेक सिद्धांत मांडले गेले. कालांतराने, तपासकर्त्यांनी त्यांचे लक्ष कॉकपिटमधील इंधन नियंत्रण स्विचवर केंद्रित केले.

ब्लॅक बॉक्स डेटावर आधारित प्राथमिक तांत्रिक मूल्यांकनात यांत्रिक बिघाड झाल्याचं फेटाळण्यात आलं. त्याऐवजी इंजिन इग्निशन आणि शटडाउन नियंत्रित करणाऱ्या स्विचच्या मॅन्युअल हालचालीकडे लक्ष वेधण्यात आले. अपघाताच्या वेळी, दोन्ही इंजिन बंद असल्याचे आढळून आले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!