April 23, 2026 3:41 pm

*तुमच्या घरात अजून एकाचा मृत्यू होणार; भोंदूबाबाची चौकडी अन् लाखो रुपयांचा अघोरी खेळ

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

तुमच्या घरावर कुणीतरी पिशाच्च सोडलं असून त्यासाठी आपल्याला कामाख्या देवीला जाऊन पूजा करावी लागेल आणि तुमच्या घरात सोन्याचे खिळे ठोकावे लागतील, असं म्हणत 4 भोंदू ज्योतिषांनी एका वृद्धाला तब्बल साडेनऊ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे.याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी या चौघांनाही बेड्या ठोकल्या असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

चंद्रकांत चिले असं या प्रकरणातील फसवणूक झालेल्या वृद्धाचं नाव असून ते मुंबईला वास्तव्याला आहेत. ते एका कार्यक्रमासाठी बदलापूरला आले असताना 4 भोंदू ज्योतिषांनी त्यांना गाठलं आणि आपल्या जाळ्यात ओढलं. तुमच्या घरावर कुणीतरी पिशाच्च सोडलं आहे, तुमच्या घरात नुकताच एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून लवकरच दुसऱ्या व्यक्तीचाही मृत्यू होणार आहे, अशी भीती त्यांनी चिले यांना दाखवली. तसंच हे थांबवायचं असेल तर आपल्याला कामाख्या देवीला जाऊन पूजा करावी लागेल आणि तुमच्या घरात सोन्याचे 4 खिळे ठोकावे लागतील, अशी बतावणी करत त्यांनी चंद्रकांत चिले यांच्याकडून तब्बल 9 लाख 72 हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही उकळले.

यानंतर काही दिवसांनी चिले यांना आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात येताच त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अर्ज दिला. याप्रकरणी गुन्हे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी तपास करून या प्रकरणात फसवणूक आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चिले यांची फसवणूक करणाऱ्या आरोपी ब्रम्हदत्त इंगळे, शिवलिंग इंगळे, भवानी इंगळे आणि अन्य एक अशा चौघांना पोलिसांनी बदलापूरमधून बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!