April 21, 2026 11:02 pm

*तरुणी रेल्वे स्टेशनच्या शौचालयात गेली, नंतर बराच वेळ बाहेरच येईना

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भायखळा रेल्वे स्थानकावर असलेल्या शौचालयात गुरुवारी दुपारी एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

मानसिक तणावातून विद्यार्थिनीने आपल्या हाताची नस कापून घेतल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी गुरुवारी दुपारच्या सुमारास भायखळा रेल्वे स्थानकात आली होती. त्यानंतर ती शौचालयात गेली. बराच वेळ ती बाहेर न आल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने बाहेर थांबलेल्या महिलांना संशय आला. त्यांनी शौचालयाचा दरवाजा ठोठावून पाहिला, मात्र आतून कोणतीही हालचाल किंवा उत्तर मिळाले नाही.

दरम्यान, एका महिलेने या प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शौचालयाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता विद्यार्थिनी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळून आली. तिच्या हाताची नस कापलेली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता.

पोलिसांनी तात्काळ जखमी विद्यार्थिनीला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळेत उपचार मिळाल्याने विद्यार्थिनीची प्रकृती सध्या स्थिर आहे. तिच्यावर पुढील वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टर तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

प्राथमिक चौकशीत विद्यार्थिनी मानसिक तणावातून जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी नोंद घेत तपास सुरू केला आहे. विद्यार्थिनीचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून, तिच्याकडून प्रकृती सुधारल्यानंतर सविस्तर जबाब नोंदवण्यात येणार आहे.

या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवरील सुरक्षितता आणि तरुणांमधील वाढता मानसिक तणाव याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, मानसिक तणाव किंवा अडचणीत असलेल्या व्यक्तींनी योग्य समुपदेशन आणि मदत घ्यावी, तसेच अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष न करता त्यांना आधार द्यावा.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!