April 23, 2026 3:50 pm

*माझ्यावर प्रेम कर… तो घरात शिरला आणि केले निर्दयी कृत्य

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. फोनवर बोलत नसल्याचा राग धरून एका तरुणाने नृत्यांगनेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.

पीडिता गायत्री तुषार सावंत (वय २६) गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गायत्री सावंत मूळची वाघोली (जि. पुणे) रहिवासी असून सध्या तपनेश्वर गल्ली, जामखेड येथे राहते. ती नृत्यांगना म्हणून काम करते आणि तिची मैत्रीण मनिषा प्रकाश जावळे यांच्यासोबत राहत आहे. आरोपी राहुल अशोक कचरे (रहिवासी खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) याच्याशी गायत्रीची ओळख मागील पाच वर्षांपासून होती, परंतु २०२४ पासून दोघांमधील संबंध तुटले होते. यापूर्वीही गायत्रीने राहुलविरोधात तक्रार दाखल केली होती.

घटना गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी Ahilyanagar Jamkhed crime रात्री सुमारे १० वाजता सुरू झाली, जेव्हा राहुलने गायत्रीला फोन करून धमकी दिली. त्याने म्हटले, “तू माझ्याशी बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. बोलली नाहीस तर मारून टाकीन.” गायत्रीने हा फोन कट केला, त्यावरून रागलेल्या राहुलने शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे २ वाजता त्याच्या हातात कोयता घेऊन इमारतीजवळ दबा धरला आणि थेट गायत्रीच्या खोलीत घुसला. त्याने गायत्रीच्या डोक्यावर, हातावर आणि बोटांवर कोयत्याने वार केले.घटनेवेळी गायत्रीची मैत्रीण मनिषा बाल्कनीत होती आणि तिने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण राहुलने शिवीगाळ करत धमकी दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.पीडितेच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात राहुल अशोक कचरेविरोधात खुनाचा प्रयत्न असा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत आहेत.या घटनेने स्थानिक समुदायात भीती निर्माण केली असून, पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शस्त्रसज्ज व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!