April 23, 2026 4:52 pm

*नगरसेवक पदाच्या मानधनाला नम्र नकार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शहरातील जनसेवेला नवा आदर्श घालून देणारा निर्णय एका नगरसेवकाने घेतला असून, आपल्या पदाच्या मासिक मानधनासह सर्व भत्ते नाकारत ही रक्कम थेट रुग्णसेवेसाठी वापरावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. नगरसेवक पद हे केवळ अधिकाराचे नव्हे तर समाजसेवेचे माध्यम असल्याची भूमिका मांडत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

आपल्या आशीर्वादाने आणि नागरिकांच्या विश्वासाने मिळालेल्या नगरसेवक पदाच्या मासिक मानधनासह इतर सर्व भत्ते नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संपूर्ण रक्कम महापौर निधीत वर्ग करून ती शहरातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांसाठी खर्च करण्यात यावी, असे आवाहन संबंधित नगरसेवकाने प्रशासनाला केले आहे.

या निर्णयाबाबतचे अधिकृत पत्र आज नगरसचिव मा. योगिता भोसले मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या पत्रामध्ये शहरातील गरजू नागरिकांना आरोग्यसेवा मिळण्यासाठी हा निधी उपयोगात आणावा, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे.

“नगरसेवक पद हे माझ्यासाठी सन्मानापेक्षा अधिक जबाबदारीचे आहे. प्रभागातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाच्या ऋणातून उतराई होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे,” अशी भावना नगरसेवकाने व्यक्त केली. नागरिकांच्या कररूपी पैशातून मिळणारे मानधन पुन्हा त्यांच्याच सेवेसाठी खर्च व्हावे, या भावनेतून हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

या निर्णयामुळे शहरातील सामाजिक व राजकीय वर्तुळात सकारात्मक चर्चा सुरू झाली असून, जनप्रतिनिधींनी जनसेवेसाठी असे आदर्शवत निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. पदातून मिळणाऱ्या आर्थिक लाभांपेक्षा समाजसेवेतून मिळणारे समाधान अधिक मोलाचे असल्याचे या निर्णयातून अधोरेखित झाले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!