July 24, 2026 4:51 am

*केडीएमसीच्या महापौर-उपमहापौरांनी हाती घेतला झाडू

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डीप क्लिनिंग स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ सोमवारी महापौर हर्षाली थविल आणि उपमहापौर राहूल दामले यांच्या हस्ते करण्यात आला.

किल्ले दुर्गाडी देवी मंदिर परिसरात हा शुभारंभ करण्यात आला.

या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासह सहाय्यक आयुक्त आयुक्त प्रिती गाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी आ’गस्टीन घुटे, नगरसेविका अस्मिता मोरे, विजया पोटे, शालिनी वायले, रेखा चौधरी, नगरसेवक गणेश जाधव, गणेश लांडगे, उमेश बोरगांवकर, मोरेश्वर भोईर, जयवंत भोईर, रमेश जाधव आदी सहभागी झाले होते.

ही मोहिम आजपासून येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत महापालिकच्या सर्व प्रभागात राबविली जाणार आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्वकष स्वच्छता ठेवुन शहर शाश्वत स्वच्छ कसे राहिल या करिता तसेच स्वच्छतेचे मानांकन उंचावण्यासाठी नगरसेवक आणि नागरिक यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!