April 23, 2026 7:55 pm

*६३ वर्षीय शिक्षकाचा १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

खासगी क्लास घेणाऱ्या एका ६३ वर्षीय शिक्षकाने १३ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. नराधम शिक्षकाच्या या कृत्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. गुजरातच्या भरूचमध्ये ही खळबळजनक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

नेमकं प्रकरण काय?

भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर तालुक्यातील एका गावात राहणारी १३ वर्षांची विद्यार्थिनी ६३ वर्षीय शिक्षकाच्या घरी क्लाससाठी जात होती. तो वृद्ध शिक्षक ‘एक्स्ट्रा क्लास’च्या बहाण्याने दर रविवारी विद्यार्थिनीला एकटीलाच घरी बोलवत असे. याच दरम्यान आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला.

भीतीपोटी मुलगी राहिली शांत

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी शिक्षकाने हे कृत्य केल्यानंतर याबद्दल कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली होती. शिक्षकाच्या या घृणास्पद कृत्यामुळे घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला या घटनेबद्दल कोणालाही काही सांगितले नाही.

तपासणीत सत्य आले समोर

काही काळानंतर मुलीने पोटात दुखत असल्याचे आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर तिला एका महिला डॉक्टरकडे नेण्यात आले, जिथे तपासणीनंतर मुलगी गर्भवती असल्याचे समजले. हे समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मुलगी दीड महिन्यांची गर्भवती होती. त्यानंतर जेव्हा तिला विश्वासात घेऊन विचारले गेले, तेव्हा तिने घडलेल्या संपूर्ण घटनेचा खुलासा केला.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. तो गेल्या ४ वर्षांपासून ट्युशन शिकवण्याचे काम करत होता. त्याच्यावर बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!