गेल्या दोन महिन्यांत शेंगदाण्याच्या दरात ४० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत १२० रुपये किलोपर्यंत असणारा शेंगदाणा १६० ते १८० रुपयांपर्यंत वधारला आहे.
आंध्र प्रदेशातून येणाऱ्या शेंगदाण्याची आवक घटल्यामुळे दर वाढले असल्याचे व्यापारी सांगतात.
केवळ शेंगदाणे नाही तर बासमती तांदळाचे दरही वाढले आहेत. प्रति किलो दहा रुपयांपर्यंत ही वाढ असल्याचे सांगण्यात आले. शेंगदाणे मात्र गेल्या दोन महिन्यांपासून सतत वाढत आहे. डिसेंबरमध्ये १०० ते १२० रुपयांपर्यंत किलो असणारा शेंगदाणा १६० ते १८० रुपयांपर्यंत वाढला आहे.
कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील शेंगदाण्याचा पेराही कमी झाल्याने दर गडगडला असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतात. व्यापारी परेश जैन म्हणाले, ‘डिसेंबरनंतर दरांमध्ये दर चार-पाच दिवसांनी वाढ होत होती. आता भाव नियंत्रणात येतील. कालपासून दर पुन्हा कमी होत आहेत. मात्र, किरकोळ बाजारात शेंगदाणा अजूनही १६० ते १८० रुपयांपर्यंत आहे.’











