April 23, 2026 7:53 pm

*अंबड शहरात बनावट नोटांचा व्यवहार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जालना जिल्ह्यातील अंबड शहरात बनावट नोटा वापरणारी टोळी उघडकीस आली असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत चौघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून एक लाख २२ हजार रुपयांचा नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

बनविण्यात आलेल्या सर्व नोटा ५०० रुपयांच्या होत्या.

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण विधिसंघर्ष बालक आहे. चौघांना साथ देणाऱ्या अन्य व्यक्तींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी नियमित गस्त घालत काही व्यक्ती ५०० रुपयांच्या बनावट नोटांची खरेदी-विक्री करत असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार कारवाई करण्यात आली.

अंबड-पाचोड रस्त्यावर शिवाजीनगर येथे अंबड येथील रंगकाम करणारा विकास अनिल गडगुळ (२६) यासह एका अल्पवयीनासह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत गडगुळ याने अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील सम्रवीर सुनील खरात (२१) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानंतर खरात याला ताब्यात घेऊन त्याच्याकडूनही बनावट नोटा जप्त करण्यात आल्याअशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी दिली.

खरातच्या पुढील चौकशीतून जालन्यातील लोढी मोहल्ला येथील आकाश नारायण शेलके (२८) आणि संभाजीनगर येथील आदित्य अमित गायकवाड (१९) यांची नावे समोर आली. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ५०० रुपयांच्या एकूण २४४ बनावट नोटा, एकूण किंमत १ लाख २२ हजार रुपये, जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!