April 23, 2026 5:15 pm

*नाशिकमधील प्रसिद्ध मंदिरातून चांदीच्या मुर्त्यांसह दानपेटीतील रोकड लंपास!

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नाशिकमधील दत्तात्रयांचे आजोळ समजले जाणाऱ्या श्रीक्षेत्र कंरजी देवस्थान येथील दत्त मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दत्तात्रयांच्या मुर्तीवरील सोन्याचे अलंकार, चांदीच्या मुर्ती, दानपेटीतील रोकड अशी ४ लाख ७५ हजारांचा एैवज चोरुन नेला आहे.मात्र चोरट्यांनी पुरातन पद्मासन स्थित मूर्तीचा चांदीचा मुकुट काढून मुर्ती तशीच ठेवली आहे.

आंबे वणी शिवारातील करंजी देवस्थान येथील अज्ञात चोरट्यांनी गुरुवार, ता. ५ मध्यरात्रीनंतर दोन ते तीन वाजेच्या दरम्यान मंदिराचा मुख्या दरवाजाचे लोखंडी शटरचे कुलूप तोडुन, काचेचे दरवाजाचे फ्रेम वाकवून व काच काढून मंदिर गाभाऱ्यात दत्त महाराजांच्या मुर्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन अंदाजे वजन ०१ तोळे (किंमत १ लाख रुपये) चोरून नेले आहे.

त्याचबरोबर गाभाऱ्यातील दत्त महाराजांचे चांदीचे मुकुट (२० हजार रुपये), तीन दानपेट्यातील भक्ताचं देणगीचे अंदाजे २ लाख रुपयांची रोकड, चांदीची गणेश मुर्ती (१ लाख रुपये), १० भार वजनाची चांदीची गणपती मुर्ती (२० हजार रुपये), दत्त महाराजांचे मुर्तीचा चांदीचा मुकूट अंदाजे १० भार वजनाचे (२० हजार रुपये), पितळाच्या लहाण मोठया ११ मुर्ती (१५ हजार रुपये) असा एकूण ४ लाख ७५ हजार रुपये किमंतीचा ऐवज चोरुन नेला आहे.

सदरची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चोरांनी रुमाल व कपड्यांनी चेहरा झाकले आहे. तसेच हातामध्ये कोयते, लोखंडी रोड असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. दरम्यान सकाळी सदरची घटना सकाळी मंदिराचे पुजारी व भाविक मंदीरात आल्यानंतर उघडकीस आली.

याबाबतची माहिती पोलिसांना कळवल्यांनतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अज्ञात चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ञास पाचारण केले होते. दरम्यान पोलिसांनी शशीकांत देवराम सवंद्रे, वय ६४ रा. करंजी, ता.दिंडोरी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्याता आला असून, याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव, पोलिस उपनिरीक्षक किरण जगदाळे करीत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!