April 23, 2026 4:39 pm

*वाशी खाडीत उडी मारणाऱ्या व्यक्तीला मच्छिमारांनी वाचवले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पावणे गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने लोकलमधून वाशी खाडीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी ५) घडली; मात्र वाशी खाडीत असलेल्या मच्छीमारांनी त्या व्यक्तीला नदीपात्रातून बाहेर काढले.

भारत शिवराम फुलमाळी (३८) असे वाचवण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, मानसिक तणावातून हे कृत्य केल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे.

घटनेतील बचावलेला व्यक्ती भारत हा अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यात राहणारा आहे. गुरुवारी (ता. ५) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास तो पनवेल-सीएसएमटी लोकलमधून मुंबईत जात होता.

या वेळी सिग्नल लागल्यामुळे लोकल वाशी खाडीपुलावर थांबली असताना, भारतने लोकलमधून थेट खाडीमध्ये उडी घेतली. सुदैवाने खाडीमध्ये ओहोटी असल्याने पाणी कमी होते. या वेळी भारत बुडत असल्याचे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्याला पाण्यातून सुखरूप बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. वाशी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याला याप्रकरणी माहिती देता आली नाही, त्यानंतर त्याचे समुपदेशन करून त्याला त्याच्या भावाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!