April 23, 2026 4:52 pm

*५५ वर्षीय पत्नीची विटेने हत्या, मुलाच्या साखरपुड्याआधीच कुटुंब उद्ध्वस्त

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पन्हाळा येथे पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात सिमेंट काँक्रिटच्या विटेने घाव घालून खून केल्याची घटना घडली. याबाबत पतीने खुनाची कबुली दिल्याने पन्हाळा पोलिसांनी आरोपी पती रमेश बाबूराव धडेल (वय ६४, मूळ गाव केर्ले, ता.करवीर, सध्या रा. पन्हाळा) याला अटक केली आहे.

याबाबत पन्हाळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोल्हापुरातील व्यावसायिक किशोर हरदास चंदवाणी यांचा पन्हाळा येथे बंगला आहे. या बंगल्याची देखरेख करण्यासाठी त्यांनी वॉचमन म्हणून आरोपी रमेश धडेल याला नोकरीस ठेवले होते. घडेल सध्या नोकरीनिमित्त चंदवाणी यांच्या बंगल्यातील वॉचमन रूममध्ये राहात होता.

मंगळवारी आरोपी रमेश व त्याची मृत पत्नी कांचन रमेश धडेल (वय ५५ , मूळ गाव केर्ले, ता. करवीर, सध्या रा. पन्हाळा) यांच्यात पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून चंदवाणी यांचे बंगल्याचे टेरेसवर वाद सुरू झाला. तेव्हा चिडलेल्या रमेशने पत्नीच्या डोक्यात सिमेंट काँक्रिटच्या विटेने घाव घातले. यामध्ये कांचन हिचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी झालेल्या वादाच्या आवाजाने धडेल यांच्या नातेवाइकांनी बंगल्याच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा रमेश हा रक्ताने माखलेल्या कपड्यांनीशी टेरेसवरून खाली येताना दिसला. तेव्हा त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रमेशला ताब्यात घेतले. त्याने टेरेसवर पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. याबाबत रमेशचे जावई शहाजी दगडू साळवी यांनी फिर्याद दिली. फिर्यादीवरून आरोपी रमेश यास पन्हाळा पोलिसांनी अटक केली.

मुलाचा होता साखरपुडा

रमेश व कांचन या दांपत्याच्या मुलाचे लग्न ठरले असून, त्याचा चार दिवसांत साखर पुडा होणार होता. त्या आधीच ही घटना घडल्याने ठरलेल्या लग्नाचे काय होणार, याचीच उपस्थितांत चर्चा सुरू होती.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!