April 23, 2026 10:43 pm

*लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचे नाव बदलण्याचा विचार सुरू असल्याचं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मिटकरी यांनी या योजनेला अजित पवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी हे विधान केल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे नाव बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तर धाराशिव येथील सभेमध्ये लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मोठं विधान केले. लाडक्या बहिणींना योग्य वेळी २१०० रुपये देऊ असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ‘मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली. अनेकांनी विरोध केला. पण लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. लाडकी बहीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. योग्य वेळी जे बोललो ते करणार लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार आहोत. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा देखील निर्णय घेणार आहोत. आम्ही घेणारे नाही तर देणारे आहोत.’

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!