April 23, 2026 9:42 pm

*मरळी, ठोसेघरचे वैद्यकीय अधिकारी निलंबित

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वैद्यकीय कामात कुचराई केल्याने पाटण तालुक्यातील मरळी आणि ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी निलंबित केले आहे.

श्रीमती नागराजन म्हणाल्या, ”वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहून आरोग्य सेवा सुविधा पुरविणे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे ठिकाणी वेळेत उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध होण्‍यास अडचणी येत असून, संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी प्रसूती, श्वानदंश, सर्पदंश, अपघातामधील रुग्ण आल्यानंतर त्यांना तातडीची सेवा उपलब्ध होत नसल्याबाबत तक्रारी येत आहेत, तसेच रात्रीच्या वेळी केंद्रांच्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने तातडीची आरोग्य सेवा मिळण्‍यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

तथापि जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेस तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होण्‍यासाठी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून कार्यस्थळी वेळेवर उपस्थित राहण्‍याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. विनापरवानगी गैरहजर राहू नये, मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. जे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात राहणार नाहीत त्‍यांच्‍यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.’

‘तपासणी मोहीम सुरू करणार

आरोग्य सेवेपासून एकही रुग्ण वंचित राहणार नाही याबाबत अनेक वेळा लेखी, तोंडी सूचना देऊन सुद्धा जिल्ह्यातील काही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतात. पुढील काही दिवसांत आरोग्य केंद्रांची तपासणी मोहीम राबवून कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा याशनी नागराजन यांनी दिला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!