April 23, 2026 7:55 pm

दिवंगत अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणार नाही

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

दिवंगत अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणार नाही; अस्थि विसर्जनाच्याच दिवशी सर्व धार्मिक विधी पूर्ण – श्रीनिवास पवार यांची माहिती

पुणे : दिवंगत अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणार नसल्याची अधिकृत माहिती त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी दिली आहे. अस्थि विसर्जनाच्याच दिवशी सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात आल्यामुळे आता अजित पवार यांच्यासाठी कोणताही पुढील विधी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्रीनिवास पवार यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी निधन झाले. त्यानंतर शुक्रवारी त्यांच्या अस्थी सावडण्याचा विधी पार पडला. याच दिवशी सोनगाव परिसरातील नीरा नदीत, नीरा–करा संगमाजवळ अस्थि विसर्जन करण्यात आले. या अस्थि विसर्जनाच्याच वेळी पारंपरिक दहाव्याचे सर्व विधी पूर्ण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

साधारणतः दशक्रिया विधी दहाव्या दिवशी केला जातो. मात्र पवार कुटुंबीयांनी शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारधारेनुसार साधेपणा स्वीकारत, अस्थि सावडण्याच्या दिवशीच सर्व धार्मिक सोपस्कार पूर्ण केल्याचे श्रीनिवास पवार यांनी सांगितले. त्यामुळे नियोजित असलेला दशक्रिया विधी रद्द करण्यात आला असून, आता कोणताही अतिरिक्त विधी केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामागे कुटुंबाची वैचारिक भूमिका आणि साधेपणाची परंपरा असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!