April 23, 2026 10:35 pm

*पिकअपमधुन पाच गोवंश वासरे पकडली

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शहरातील चामडा बाजार भागात कत्तलीसाठी पिकअपमधुन आणलेले पाच गोवंशीय जातीचे वासरे सदर बाजार पोलिसांनी पकडले. या प्रकरणी ७लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

सदर बाजार पोलिस ठाण्याचे जमादार जाधव यांना खबऱ्याने माहीती दिली कि, देऊळगाव राजा येथुन पिकअपमधुन आणलेले गोवंशीय जातीचे पाच वासरे चमडा बाजारात कत्तलीसाठी आणण्यात येत आहे. जाधव यांनी सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भारती यांना सदर माहीती सांगीतल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सचिन सानप, जमादार जाधव पोलिस कर्मचारी तेजनकर हे चमडा बाजार परिसरात गेले. यावेळी संशयीत पिकअप मधुन जनावरे खाली करतांना पोलिसांनी पाच गोवंशीय वासरे पकडले.

त्यांनतर पोलिसांनी सदर पिकअप मधुन ही गोवंशीय वासरे मंठा रोडवरील राममुती येथील श्री गुरुगणेस गोशाळा येथे नेले. आरोपींनी पिकअपमधे अत्यंत निर्दयीपणे दाटीवाटीने वासरांना ठेवल्याचे निदर्शनास आले.

गुन्हा दाखल

पोलिसांनी पिकअप चालक शेख फिरोज शेख ईब्राहीम (रा वलीमामुदर्गा जालना) यास जनावरे कोठुन व कशासाठी आणले असे विचारले असता त्याने मंगळ बाजार येथील तीन जणांनी सदर गोवंशीय वासरे कत्तलीसाठी आणल्याचे सांगीतले. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!