May 13, 2026 11:15 pm

*विविध पक्षांच्या नेत्यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेऊन केले सांत्वन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची बोलणी आणि सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची घेतलेली शपथ या महाराष्ट्रातील वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडींची चर्चा आज संसदेच्या वर्तुळात चांगलीच रंगल्याचे दिसले.

लोकसभेमध्ये अर्थसंकल्प मांडण्याआधी आणि नंतरही वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना भेटून चौकशी केली. अर्थसंकल्पासाठी सुप्रिया सुळे आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास सभागृहात पोहोचल्या होत्या. राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) खासदार मीसा भारती, द्रमुकच्या कनिमोळी यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली आणि सांत्वन केले.

काँग्रेसचे केरळमधील खासदार हायबी इडन यांनी सुप्रिया सुळे यांचेही त्यांनी सांत्वन केले. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, ‘आरएसपी’चे एन. के. प्रेमचंद्र, काँग्रेसचे मणिकम टागोर, तारिक अन्वर हे खासदारही सुप्रिया सुळे यांना भेटले. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वद्रा यांनी सुळे यांच्याशी चर्चा केली.

लोकसभेचे कामकाज तहकूब होताच अपना दलाच्या नेत्या व वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, शिवसेना (यूबीटी) खासदार अरविंद सावंत, काँग्रेसच्या कुमारी शैलजा, खासदार ज्योतीमणी, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनीही सुप्रिया सुळेंना भेटून चौकशी केली.

विलीनीकरणाबाबत काँग्रेसकडून चौकशी

महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांकडेही राजकीय घटनाक्रमाबद्दल अन्य राज्यांमधील खासदार विचारणा करत असल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडे दोन्ही ‘राष्ट्रवादीं’च्या विलीनीकरणाच्या चर्चांबाबत चौकशी केल्याचेही दिसले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!