May 14, 2026 4:07 am

*बाग्लादेशमध्ये भूकंप, भारतानं दिला जोरदार धक्का

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भारतानं बाग्लादेशमध्ये सध्या असलेल्या मोहम्मद यूनुसच्या सरकारला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका दिला आहे. रविवारी एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला.

या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी टेक्सटाइल इंडस्ट्रीसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता बांग्लादेशच्या अर्थव्यवस्थेचा कणा तुटणार आहे, भारतानं टेक्सटाइल संदर्भात अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेचा सर्वात मोठा फटका हा बांग्लादेशच्या टेक्सटाइल इंडस्ट्रीला बसणार आहे. केवळ अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणाच नाही, तर भारतानं युरोपियन यूनियन सोबत केलेल्या एफटीएमुळे देखील बांग्लादेशमधील कापड उद्योग मोठ्या संकटात सापडला आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला, ज्यामध्ये त्यांनी सिल्क प्रोडक्शन, मशनरी सपोर्ट, हँडलूम आणि हँडीक्राफ्ट प्रोगाम, तसेच टेक्सटाइल सेक्टरमध्ये कौशल्य विकासाची घोषणा केली आहे.

 

या अर्थसंकल्पामध्ये श्रम -केंद्रीत वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी मजबूत धोरणांवर भर देण्यात आला आहे. जागतिक स्पर्धेसाठी वातावरण निर्मिती तसेच स्वावलंबन आणि रोजगार वाढीला चालना देणं हा त्यामागचा उद्देश आहे. बांग्लादेशचा कापड उद्योग हा भारतासमोर मोठं आव्हान आहे, बांग्लादेश हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश आहे, तर भारतचा जगात सहावा क्रमांक लागतो. चीन हा कापड निर्यात उद्योगामध्ये पहिल्या स्थानावर आहे.

दरम्यान बाग्लादेशमध्ये मोहम्मद यूनुस यांचं सरकार आल्यापासून तेथील सरकारची पाकिस्तानसोबत जवळीक वाढली आहे, तसेच भारतासोबत असलेला संघर्ष वाढत आहे, दरम्यान भारतानं देखील आता बांग्लादेशला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे, भारतानं आजच्या अर्थसंकल्पात त्या दृष्टीने मोठं पाऊल उचललं आहे, याचा मोठा फटका हा बांग्लादेशच्या कापड मार्केटला बसणार आहे. बांग्लादेशमध्ये सध्या अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात सुरू आहे, याचाही फटका सध्या बग्लादेशच्या मार्केटला बसत आहे. बांग्लादेशची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. त्यातच आता भारत देखील बाग्लादेशला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. तेथील सरकार अस्थिर आहे, देशात मोठा गोंधळ सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!