May 14, 2026 4:12 am

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला शासकीय दौरा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे.

28 जानेवारी रोजी अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे विरोधकांनी नाराजी देखील व्यक्त केली. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिला दौरा होणार आहे.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत पवार कुटुंब अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांचा मुंबईमध्ये शपथविधी असल्याचे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच पार्थ पवार यांनी शपथविधीपूर्वी शरद पवारांची भेट देखील घेतली होती. यानंतर आता सुनेत्रा पवार या काटेवाडीमध्ये दाखल झाल्या. काटेवाडीमध्ये त्यांनी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली. यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या त्यांच्या पहिल्या दौऱ्यावर जाणार आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिला दौरा हा साताऱ्याला असणार आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या आज कराड आणि फलटणच्या दाैऱ्यावर आहेत. सुनेत्रा पवार आज सकाळीच साताऱ्याकडे रवाना झाल्या. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांचा पहिलाच शासकीय दौरा आहे. या दौऱ्यामध्ये 10 वाजता कराड येथे सुनेत्रा पवार या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी दर्शन घेणार आहेत. त्यानंतर फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जात अजित पवारांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यानंतर त्या बारामतीकडे रवाना होतील. शरद पवार हे कालच मुंबईत आले. रोहित पवार देखील मुंबईत असल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवार यांचे अपघाती निधन

दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 फेब्रुवारी रोजी बुधवारी विमान अपघात झाला. . लँडिंगदरम्यान विमान (Learjet 45) धावपट्टीजवळ कोसळले. यामुळे विमानामध्ये तीन स्फोट झाले. विमानाला लागलेल्या आगीमध्ये सर्व प्रवासी आणि विमान जळून खाक झाले. या विमानाचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. गुरुवारी बारामतीतील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!