May 14, 2026 2:09 am

*सांगलीत हिट अँड रन’चा थरार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

कुणी कामावरून घरी परतत होतं, कुणी बाजारातून भाजी घेऊन निघालं होतं, तर कुणी कर्तव्यावर तैनात राहून रस्ता सुरक्षित करत होतं… कोणालाच ठाऊक नव्हतं की, पुढच्याच क्षणी मृत्यू समोर येईल.

समोरून इनोव्हा कार आली आणि दिसेल त्याला चिरडत घेऊन गेली. इनोव्हा चालवणारा व्यक्ती पिऊन तर्राट होता, या मद्यधुंद व्यक्तीच्या गाडीची संतप्त लोकांनी तोडफोड केली. सांगलीकरांनी हिट अॅण्ड रनचा थरार डोळ्यादेखत पाहिला.

कुठे घडली घटना

सांगली शहराचे हार्ट समजल्या जाणाऱ्या गणपती मंदिर ते टिळक चौक परिसरात सोमवारी एका मद्यधुंद कार चालकाने जे केलं त्यानं थराराने संपूर्ण शहर हादरून गेलं. इनोव्हा चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या १४ ते १५ जणांना जोरदार चिरडलं. या भीषण अपघातात ४ वाहतूक पोलीसही जखमी झाले असून, जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इनोव्हा चालक प्रचंड मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने गाडीवरचा ताबा पूर्णपणे गमावला होता. गणपती पेठेतून टिळक चौकाकडे जात असताना त्याने रस्त्यावरील दुचाकी, पादचारी आणि बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांना एकामागून एक धडक दिली. चालक गाडी कशी चालवत होता, याचा एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यात गाडी वेडीवाकडी धावताना दिसत आहे.

जमावाचा संताप आणि तोडफोड

हा थरार पाहून रस्त्यावरील नागरिक संतापले. अनेक जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून संतप्त जमावाने धावत जाऊन ही इनोव्हा कार अडवली. लोकांनी केवळ कारची तोडफोडच केली नाही, तर मद्यधुंद चालकाला गाडीबाहेर काढून ‘बेडम’ चोप दिला. या मारहाणीत चालकही गंभीर जखमी झाला असून त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पोलीस प्रशासनाची धावपळ

अपघाताची माहिती मिळताच सांगली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींमध्ये ४ वाहतूक पोलीस असल्याने पोलीस दलातही मोठी खळबळ उडाली आहे. सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आरोपी चालकावर कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!