April 19, 2026 11:22 pm

*महाराष्ट्र ऑलिम्पिक भवनला अजित पवार यांचे नाव देण्याची राज्य शासनाकडे मागणी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यातील बालेवाडी-म्हाळुंगे येथे शिवछत्रपती क्रीडा नगरीत उभारण्यात येत असलेल्या नियोजित महाराष्ट्र ऑलिम्पिक भवनला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे दिवंगत अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांचे नाव देऊन क्रीडा क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची स्मृति कायम राखावी अशी मागणी पुणे हौशी अॅथलेटिक संघटनेचे अध्यक्ष अॅडवोकेट अभय छाजेड यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

तसेच देशात मॅरेथॉन क्रीडा संस्कृतीची पायाभरणी करणाऱ्या भारतीय ऑलिंपिक महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची स्मृती जतन करण्यासाठी पुण्यात दरवर्षी होणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यापुढे कै. सुरेश कलमाडी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळखली जाईल असे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे विश्वस्त म्हणून अॅडवोकेट अभय छाजेड यांनी जाहीर केले.

पुणे हौशी अॅथलेटिक संघटनेतर्फे पुण्यातील सणस मैदान येथे सबज्युनिअर क्रीडा स्पर्धांना आज प्रारंभ झाला त्यावेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपस्थित सर्व खेळाडू, पंच व क्रीडा रसिकांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून अजित पवार व सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली वाहिली.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!