अजित पवार यांच्या (Supriya Sule) अकाली निधनाने महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. २९ जानेवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आणि आज त्यांच्या अस्थींचे विसर्जनही झाले. मात्र, या दुःखाच्या सावलीतच राज्याच्या राजकारणाने एक नवे आणि धक्कादायक वळण घेतले आहे.
अजितदादांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आता त्यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार विराजमान होत आहेत. या निर्णयाने पवार कुटुंबातील अंतर्गत संघर्ष समोर येत आहे.
अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादीची (अजित पवार गट) धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतल्याचे समजते. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे, या ऐतिहासिक निर्णयाबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले आहे. शरद पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, “सुनेत्रा यांनी केवळ प्रतिभा काकींना फोन करून सांगितले, पण शपथविधीबाबत कोणतीही चर्चा केली नाही.” यामुळे कुटुंबात आणि पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सुनेत्रा पवारांनी शरद पवारांशी चर्चा न करता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने, सुप्रिया सुळे या सोहळ्याला गैरहजर राहणार आहेत. यामुळे दोन्ही राष्ट्रवादीत मिठाचा खडा पडला कि काय? यावर चर्चा सुरु झाली आहे.











