April 20, 2026 2:40 am

अजितदादांना शेवटचं पाहायला गर्दी आऊट ऑफ कंट्रोल

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा अविभाज्य भाग राहिलेल्या आणि भविष्यात महाराष्ट्राला दिशा देऊ शकणाऱ्या नेत्यांपैकी एक असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामतीत अपघाती निधन झाले. अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाच्या  धावपट्टीवर उतरत असताना कोसळले आणि त्याचा प्रचंड मोठा स्फोट झाला. यामध्येच अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचे निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज अजित पवार यांच्यावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

तत्पूर्वी अजित पवार यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी बारामती वैद्यकीय महाविद्यालयातून काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी अजित पवार यांना शेवटचा निरोप द्यायला काटेवाडीच्या ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. बारामतीकरांचे अजित पवार यांच्यावर प्रचंड प्रेम होते. अजित पवारही अनेक सण आपल्या काटेवाडीच्या घरी साजरे करत. त्यामुळे अजित पवार यांच्याशी येथील जनतेची नाळ जुळलेली होती. त्यामुळे आज अजित पवार यांचे पार्थिव काटेवाटी येथील निवासस्थानी आणल्यानंतर त्यांच्या घराबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी आवरताना पोलिसांना प्रचंड अवघड जात आहे.

काटेवाडी येथे अजितदादांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिक बाहेर जमले आहेत. मात्र, गर्दीचा रेटा एवढा आहे की, अजित पवार यांच्या बंगल्याचे गेटही पोलिसांना लावता येत नाही. 20-30 पोलिसांनी जोर लावूनही बंगल्याचा दरवाजा लावला जात नव्हता. गर्दीवरील पोलिसांचे नियंत्रण सुटल्यामुळे अखेर आमदार रोहित पवार यांना बाहेर यावे लागले. रोहित पवार यांनी बंगल्याच्या गेटवर चढत बाहेरच्या गर्दीला शांत राहण्याचे आवाहन केले. रोहित पवारांनी गर्दीतील लोकांना विनंती करुन शांत बसवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांकडून बाहेरच्या गर्दीतील लोकांना एक-एक करुन आत सोडण्यात आले. तेव्हाही रोहित पवार यांनी काटेवाडीच्या ग्रामस्थांशी संवाद साधला.

अजित पवार यांची थोड्याचवेळात काटेवाडी येथून अंत्ययात्रा काढली जाईल. त्यांच्यावर सकाळी 12 च्या आसपास विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार केले जातील. अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी बारामती येथे अनेक बडे राजकीय नेते दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर बारामती विमानतळावर पोलिसांसह एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी येणारे सर्व VIP बारामती विमानतळ येथे पोहोचतील. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस पथक आणि NDRF ला पाचारण करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यासाह विविध मान्यवर बारामतीला पोहोचणार आहेत.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!