April 20, 2026 10:40 am

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक 89 जागा जिंकून भाजप आपल्या स्वप्नाच्या जवळ पोहोचला असला तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत अद्याप एकमत न झाल्याने मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक (Mumbai Mayor Election 2026) लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यासाठी अनेक कारणे असल्याचे सांगितले जात आहे. भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची अद्याप गटनोंदणी प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महापौर निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 31 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता सगळ्या अडचणी पाहता नवीन महापौराची निवड फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे.

 

पालिकेच्या निवडणुकीनंतर 27 जानेवारी रोजी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार होते. तसेच 31 जानेवारी रोजी महापौर निवडीची जाहिरात देण्याची तयारी प्रशासनाने केली होती. मात्र, रात्री उशिरा हा संपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती आहे. गटनोंदणी पूर्ण न झाल्याने महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भाजप आणि शिवसेना युतीबाबत एकत्रित गट स्थापन होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

 

महापौरपदावर भाजपने दावा केला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपदावर दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील अंतर्गत चर्चा आणि वाद मिटल्याशिवाय एकत्रित गटनोंदणी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गटनोंदणी पूर्ण झाल्यानंतरच महापौर निवड प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.

 

मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक लांबणीवर का पडली?

 

मुंबई महानगरपालिकेत भाजपचे 89 आणि शिंदे सेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. या दोन्ही पक्षांकडे 118 इतके बहुमताचे संख्याबळ आहे. महापौरपदाच्या आरक्षण सोडतीत मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले होते. त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने 31 जानेवारीला दुपारी 12 वाजता निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. पालिका आयुक्त भूषण गगराणी त्यांनी तशा सूचनाही दिल्या होत्या. परंतु, भाजप आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांची गट नोंदणीची प्रक्रिया झालेली नाही. तसेच भाजप आणि शिवसेनेत महापौरपदाच्या नावाबाबत अद्याप एकमत झालेले नाही. तसेच स्थायी समिती व अन्य पदांबाबातच्या वाटाघाटी संपलेल्या नाहीत. दोन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये याबाबत शुक्रवारी रात्री बैठक झाली. या बैठकीनंतर महापौरपदाची निवडणूक 31 जानेवारीला न घेण्याचा निर्णय झाल्याचे समजते.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!