April 20, 2026 7:30 am

प्रेमसंबंधातून मुंढव्यात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची गंभीर घटना पुण्यातील मुंढवा परिसरात घडली आहे. या प्रकरणी टोळक्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

या घटनेत प्रवीण धनंजय माने (वय २४, रा. श्रीमाननगर, शेवाळवाडी, पुणे–सोलापूर रस्ता) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी महेश सरोदे (वय ३५, रा. भीमनगर, मुंढवा) याच्यासह अन्य चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जखमी माने याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण माने याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. हे संबंध तोडण्याबाबत आरोपी महेश सरोदे याने माने याला वारंवार दबाव टाकला होता. मात्र माने याने यास नकार दिल्याने आरोपींचा राग वाढत गेला.

दि. १९ जानेवारी रोजी सरोदे याने माने याला मुंढवा परिसरात बोलावून घेतले. तेथे आधीपासूनच दबा धरून बसलेल्या सरोदे व त्याच्या साथीदारांनी माने याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी माने याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर एका आरोपीने तीक्ष्ण शस्त्राने माने याच्यावर वार केला.

या हल्ल्यात माने गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे व इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सरोदे आणि त्याच्या बरोबर असलेल्या साथीदारांनी माने याला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुझा गेम वाजवू, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. माने याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या सरोदे याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पिंगुवाले तपास करत आहेत.

 

प्रेमसंबंधातून निर्माण होणाऱ्या वादांना हिंसक वळण मिळत असल्याच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!