April 25, 2026 3:51 pm

मुऱ्हा देवी मंदिरात चोरी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अमरावती : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा देवी मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. अज्ञात चोरट्यांनी देवीचा मुकुट आणि दानपेटी लंपास केली आहे.

 

मध्यरात्री अडीचच्या सुमारास झाली चोरी :

रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून देवीचा मौल्यवान चांदीचा मुकुट चोरून नेला. तसंच मंदिराबाहेर ठेवलेली दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली.

 

सकाळी उघडकी आली घटना –

सोमवार सकाळी  नेहमीप्रमाणे मंदिर उघडल्यानंतर चोरी झाल्याचं लक्षात येताच ग्रामस्थांनी तत्काळ रहिमापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता, तोंडाला मास्क आणि जॅकेट परिधान केलेल्या दोन संशयित व्यक्ती चोरीच्या सुमारास परिसरात वावरताना दिसून आल्या. या फुटेजच्याआधारे पुढील तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांनी दिली.

 

गावात संतापाची लाट :

चोरीच्या या घटनेनंतर मुऱ्हा गावात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. देवस्थानासारख्या पवित्र ठिकाणी चोरी झाल्यानं भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मुऱ्हा देवी मंदिरात घडलेली चोरीची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे, असं मंदिराचे अध्यक्ष साहेबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

 

चोरट्यांना होणार लवकरच अटक :

चोरीच्या हा घटनेनंतर गावात खळबळ उडाली असताना उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे आणि रहिमापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनंत वडतकर यांच्यासह अंजनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर यांच्यासह सहाय्यक पोलीस अधिकारी गजानन सोनवणे मंदिर परिसरात पोहोचले. अमरावती येथून विशेष पथक चोरीच्या घटनेचा छडा लावण्याकरता येणार असून चोरट्यांना लवकरच अटक केली जाईल, असं उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांनी सांगितलं.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!