April 25, 2026 3:51 pm

कर्नाटकचे डीजीपी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

कर्नाटकचे डीजीपी दर्जाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव हे सोमवारी पुन्हा एकादा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कथित व्हिडिओ व्हायरलमध्ये ते कार्यालयात एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आलेत. यापूर्वी त्यांची सावत्र मुलगी ही सोने तस्करीच्या गुन्ह्यात सापडल्यानं आयपीएस रामचंद्र राव हे चर्चेत आले होते.

 

आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांनी कथित आक्षेपार्ह व्हिडिओ बनावट आणि प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं एआयद्वारे तयार केल्याचा दावा केला आहे. “मी माझ्या वकिलांशी चर्चा करत असून त्यामध्ये सामील असलेल्या लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करणार आहे. व्हिडिओमुळे मला धक्का बसला आहे. हे सर्व व्हिडिओ बनावट आहेत,” अशी राव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर प्रतिक्रिया दिली.

 

दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई-

आयपीएस अधिकारी राव यांनी कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांचीही भेट घेऊन आपली बाजू मांडली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. दोषी आढळल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा त्यांनी इशारा दिला. ते म्हणाले, “मला आज सकाळी या व्हिडिओंबद्दल माहिती मिळाली. आम्ही कोणालाही सोडणार नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.”

 

यापूर्वी कशामुळे चर्चेत आले होते रामचंद्र राव-

रामचंद्र राव हे कन्नड अभिनेत्री रन्या राव यांचे सावत्र पिता आहेत. अभिनेत्री रन्या ही सध्या कोट्यवधी रुपयांच्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात तुरुंगात आहे. रन्याचे तस्करी प्रकरण उजेडात आल्यानंतर राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. आयपीएस अधिकारी राव तिला सोन्याच्या तस्करीमध्ये मदत करत होते की नाही, याची चौकशी करण्यात आली. चौकशी करून त्यांना निर्दोष ठरवण्यात आलं. त्यानंतर त्यांची नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे (DCRE) डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये- कथित आक्षेपार्ह व्हिडिओमध्ये डीजीपी राव आपल्या कार्यालयात गणवेशात बसलेले आहेत. त्यात एका महिलेचे कथितपणे चुंबन घेताना आणि तिला मिठी मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ बेळगावमध्ये सेवेत असताना चित्रित केल्याचं सांगितलं जात आहे.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!