April 23, 2026 11:59 pm

डॉन अरुण गवळीच्या मुलीला हरवणारा मी रोहिदास लोखंडे

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

दाऊद, छोटा शकील, अबू सालेम, छोटा राजन या सारख्या गुंडाना पुरुन उरणारा डॉन म्हणजे दगडी चाळीतला अरुण गवळी. अरुण गवळीला (Arun Gawli) ओळखत नाही असा मुंबईतलंच नव्हे तर देशातील व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. गुंडगिरीमध्ये त्याला मात देणं कुणाला जमलं असेल की नाही ते माहिती नाही, परंतु राजकारणात मात्र त्याला एका पठ्ठ्याने मात दिली आणि स्वतःची ओळखही तशीच करून दिली. ‘मी डॉन अरुण गवळीच्या मुलीला पाडणारा’ अशी स्वतःची ओळख एका नगरसेवकाने मुख्यमंत्र्यांना करुन दिली आणि आजूबाजूचे सगळे आश्चर्याने पाहतच राहिले.

 

ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने मुंबई महापालिका काबीज केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सर्व नवनियुक्त नगरसेवकांची भेट घेतली. यावेळी प्रत्येकजण आपापली ओळख करून देत होता. त्यात एक भारदस्त आवाज आला, ‘मुख्यमंत्री साहेब, मी मुंबईचा नाही तर महाराष्ट्राचा डॉन अरुण गवळीच्या मुलीला हरवणारा रोहिदास लोखंडे’. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्या नगरसेवकाशी आनंदाने हस्तांदोलन केलं.

 

योगिता गवळींचा पराभव

भाजपच्या रोहिदास लोखंडे (Rohidas Lokhande) यांनी भायखळ्यातील प्रभाग क्रमांक 207 मधून अरुण गवळीच्या कन्या योगिता गवळी यांचा पराभव केला. त्यामुळे योगिता गवळी यांचा राजकारणातील प्रवेश मात्र हुकला आहे. मुंबई महापालिकेमध्ये 89 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेवर आता महायुतीचा महापौर बसणार हे निश्चित झालं आहे. दुसरीकडे ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीला मात्र केवळ 72 जागांवर समाधान मानावं लागलंय.

 

मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आवाहन

भाजपच्या नवनियुक्त नगरसेवकांशी संवाद साधला. भाजप आणि शिवसेनेला सर्व मुंबईकरांनी मतदान केलं आहे. लवकरच मुंबई महापालिकेवर महायुतीचा महापौर बसवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आता एकही मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.

यावेळी बोलताना मुंबई आता थांबणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. जे सोबत येतीत त्यांच्यासह आणि जे सोबत येणार नाही त्यांच्याशिवाय मुंबईचा विकास करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईतील भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला, यावेळी त्यांनी मुंबईकरांचे आभारही मानले.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!