April 23, 2026 7:43 pm

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत रूट मार्च

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे | प्रतिनिधी

पुणे महानगरपालिका निवडणूक 2025–2026 च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आज मंगळवार, दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6.30 ते 8.00 वाजेपर्यंत एरिया डॉमिनेशन पेट्रोलिंग अंतर्गत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.

हा रूट मार्च कात्रज पोलीस चौकी व दत्तनगर पोलीस चौकी हद्दीत पार पडला. रूट मार्चचा मार्ग कात्रज पोलीस चौकीपासून सुरू होऊन डिलाईट बेकरी, जामा मशीद, भगवा चौक, संतोषी माता मंदिर, घुंगरूवाला चाळ, राजे चौक, सच्चाई माता अटल चाळ, पाण्याची टाकी, खंडोबा मंदिर, अंजनी नगर, दिग्विजय मित्र मंडळ, कात्रज भाजी मंडई असा होता. त्यानंतर शनी नगर चौक, हनुमान नगर, जांभूळवाडी रोड मार्गे रूट मार्च दत्तनगर पोलीस चौकी येथे समाप्त करण्यात आला.

या रूट मार्चमध्ये आंबेगाव पोलीस स्टेशनकडील २ पोलीस निरीक्षक, ६ पोलीस अधिकारी व ५० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. निवडणुकीच्या काळात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, तसेच समाजकंटक व गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक ठेवणे हा या रूट मार्चचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

(शरद झिने)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
आंबेगाव पोलीस ठाणे, पुणे शहर

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!