April 23, 2026 10:37 pm

आमिर खानला त्याच्याच ऑफिसमधून सेक्युरिटी बाहेर काढते तेव्हा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर समोर आला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या एका भागात सुनील ग्रोव्हरने ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानची अगदी हुबेहूब नक्कल केली होती. याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सुनील ग्रोव्हर आणि आमिर खान आमनेसामने आले आहेत.

 

आमिर खानच्या प्रॉडक्शनअंतर्गत बनत असलेल्या आगामी ‘हॅपी पटेल’ सिनेमाच्या नव्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये सुनील पुन्हा एकदा आमिरची नक्कल करताना दिसतोय. यावेळी तो इतका हुबेहूब अभिनय करतो की, वीर दास आणि इतर सगळ्यांना सुनील हाच खरा आमिर खान वाटतो. त्यात मजेशीर प्रकार तर पुढे घडतो. नेमकं असं काय घडलंय? चला जाणून घेऊ…

 

या व्हिडीओची सुरुवात होते ती वीर दासच्या एन्ट्रीनं… तो आमिर खानच्या ऑफिसमध्ये येतो. तेव्हा सुनील ग्रोव्हर आमिरच्या कपड्यांत आणि अगदी हुबेहूब त्याच्याच स्टाइलमध्ये बसलेला दिसतो. सुरुवातीला वीरला शंका येते, पण सुनील इतका उत्तम अभिनय करतो की, वीरचा विश्वास बसतो. सुनील वीर दासला स्वतःची ओळख आमिर म्हणून करून देतो आणि ‘हॅपी पटेल’ या चित्रपटाचं तो भरभरून कौतुकही करतो. आमिर खानच्या लुकमधील सुनील म्हणतो, “मला तुझा खूप अभिमान आहे. काय जबरदस्त चित्रपट बनवला आहेस!”

इतकंच नाही तर सुनील (आमिर बनून) वीरला चेकही देतो आणि सिक्वेलदेखील बनवायला सांगतो. तो म्हणतो, “हा माझा अनुभव आहे. जर हा चित्रपट सुपरहिट नाही झाला, तर माझं नाव आमिर खान नाही. तुझा हा सिनेमा नक्कीच ऑस्कर जिंकणार आहे. हा घे सिक्वेलचा चेक!”

 

तेवढ्यात खरा आमिर खान तिथे येतो. सुनीलला स्वतःची नक्कल करताना पाहून तो संतापतो आणि वीर दासला विचारतो, “हा कोण आहे?” पण वीरला खरा आमिर ओळखताच येत नाही. उलट तो आमिरकडे बोट दाखवत म्हणतो, “हा सुनील ग्रोव्हर आहे.” हे ऐकून आमिर आणखीनच चिडतो आणि सिक्युरिटीला बोलावतो.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!