April 23, 2026 10:36 pm

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पैशांची गाडी पकडल्याचा दावा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार आहेत. फक्त मुंबईच नाही तर राज्यभरातील सर्व 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रचाराची वेळ ही उद्या मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची एकत्रित प्रचारसभा आज पार पडली. तर मुंबईत महायुतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा पार पडली. एकीकडे प्रचारसभांमुळे वातावरण तापलेलं असताना मुंबईत आणखी राजकीय वातावरण तापलेलं बघायला मिळत आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक गाडी पकडत पैसे वाटपाचे आरोप केले आहेत.

 

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता उद्यापासून प्रचार संपल्यानंतर पैशांचं वाटप केलं जाईल, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (12 जानेवारी) ठाण्याच्या सभेत केला. कल्याण-डोंबिवली शहरात तर प्रत्येक मतदाराला चक्क पाच-पाच हजार रुपयांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी 5-5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा केला. त्यांनी त्या उमेदवारांना मंचावर बोलवत त्यांनी पैशांसाठी माघार घेतली नाही म्हणून त्यांचं कौतुक केलं. राज ठाकरेंकडून पैसे वाटपाचा हा आरोप केला जात असताना मुंबईतील कुलाब्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक गाडी पकडली आहे. तर दोन गाड्या या पळून जाण्यात यशस्वी झाल्याचा आरोप आहे. संबंधित गाडीत पैसे सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कुलाब्यात नेमकं काय घडतंय?

मुंबईतील कुलाबा परिसरात मोठा राजकीय गोंधळ झाल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एक गाडी पकडली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित गाडीतून पैशांचा वाटप केला जात असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात पैसे घेऊन जाणारी एक गाडी पकडली. या गाडीत तीन बॅग भरुन पैसे आणि मतदार याद्या असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

 

ठाकरे गटाचे वॉर्ड क्रमांक 225 उमेदवार अजिंक्य धात्रक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “आताच प्रभाग क्रमांक 225 च्या हद्दीत सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे एका वॅगनार गाडी आणि त्या गाडीत जो चालक होता त्याकडे पैसे आणि या मतदारसंघातील मतदार याद्या सापडल्या आहेत. तो काही लोकांना इथे पैसे वाटपाचं काम करत होता. जेव्हा त्याला विचारण्यात आलं की, तू कुठून आलास? तू कोण आहेस? तेव्हा तो म्हणाला की, मी उरणचा आहे. हे माझ्या व्यवसायाचे प्रश्न आहेत. मतदारांना कुठेतरी हे पैशांचं आमिष दाखवून हा सगळा प्रकार चालू आहे. उरण म्हणजे आता ते कुठलं कनेक्शन आहे ते आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल”, अशी प्रतिक्रिया अजिंक्य धात्रक यांनी दिली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!