April 23, 2026 10:35 pm

पत्रकारांच्या प्रश्नांना अजित पवारांचं भन्नाट उत्तर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

लोकसभा आणि विधानसभेला अटीतटीच्या ठरलेल्या अन् एकमेकांविरोधात उभे ठाकलेले दोन पक्ष आता पालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांच्या हातात हात घालून प्रचार करताना दिसत आहे. पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, या निवडणुकीसाठी अजित पवार एकटेच प्रचारसभा अन् रॅलींमध्ये दिसतात. सुप्रिया सुळे कुठेच दिसत नसल्याने चर्चाना जोर आला आहे. दरम्यान, आज पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीने संयुक्त वचननामा जाहीर केला. यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेत अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र पाहायला मिळाले.

२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकले झाली. अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटातील वरिष्ठ नेत्यांमधील धुमश्चक्री अवघ्या राज्याने पाहिली. त्यानंतर झालेल्या लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुका दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेच्या ठरल्या होत्या. लोकसभेला शरद पवार गटाला यश मिळालं तर विधानसभेत अजित पवारांनी बाजी मारली. मात्र, आता पालिका निवडणुकीसाठी हे दोन्ही गट एकत्र आले आहेत. दरम्यान, आज अजित पवारांनी पक्षाचा वचननामा जाहीर केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हेही उपस्थित होते.

पालिका निवडणुकीच्या प्रचारसभांसाठी अजित पवार ठाण मांडून बसले आहेत. रॅली, प्रचारसभांना अजित पवार होते. पण सुप्रिया सुळे कुठेच दिसल्या नाहीत, असं का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना पत्रकारांनी विचारला. त्यांच्या प्रश्नावर अजित पवारांनी लागलीच उत्तर दिलं. ते म्हणाले, “तिने मला सांगितलं की दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं. मी तुझ्या पाठीशी मी आहेच.” अजित पवार असं उत्तर देत असतानाच सुप्रिया सुळेंनाही हसू आवरता आलं नाही.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!