पावसाळा सुरु होण्याआधी नाशिक शहरात अधूनमधून वेगवेगळ्या कारणांनी काही भागांमध्ये तर कधी संपूर्ण शहरात पाणी पुरवठा बंद राहू लागला आहे. या पाणी पुरवठा बंदच्या संकटाला सामोरे जाताना नाशिकचे नागरिक वैतागले असताना २६ मे रोजी पुन्हा शहरातील काही प्रभागांमध्ये सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
तसेच २७ मे रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नाशिक महापालिका पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
शहरातील कृषीनगर, सिध्दार्थनगर झोपडपट्टी परिसरात बारा बंगल्यापर्यंत जलवाहिनी नेण्यात आली आहे. सध्या शहरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध कामे सुरु आहेत. पंचवटीतील निलगिरी बाग जलुशुध्दीकरण केंद्राला पाणीपुरवटा करणारी ९०० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी सोमवारी सायंकाळी फुटली. नवीन पाईपलाईन टाकताना यंत्राचा धक्का पाईपलाईनला लागला. आणि आधीची पाईपलाईन फुटली. परिस्थिती लक्षात घेत महापालिकेने तातडीने पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे २६ मे रोजी पंचवटी आणि नाशिक पूर्व विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच २७ मे रोजी सकाळचा पाणीपुरवठाही कमी दाबाने होणार आहे.
कृषीनगरजवळ सिध्दर्थनगर परिसरात पाईपलाईन फुटल्याचे लक्षात येताच कामगारांनी संबंधित ठिकाणी खड्डे करुन त्याच ठिकाणी पाणी साठवण्याचा प्रयत्न केला. पाणीरपुरवठा विभागाने तातडीने मुख्य जलवाहिनीचा पाणी पुरवठा बंद करुन दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे २६ मे रोजी पंचवटीसह पूर्व विभागातील पाणीपुरवठा बंद ठेवणे भाग पडले आहे. नागरिकांनी परिस्थिती लक्षात घेत काटकसरीिने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पमहापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
आज पाणी पुरवठा बंद राहणारा भाग
प्रभाग क्रमांक १ – रामेश्वरनगर, निसर्गनगर आणि परिसर
प्रभाग क्रमांक २- धात्रक फाटा, निशांत व्हिलेज, महालक्ष्मीनगर, शरयू पार्क, आडगाव-म्हसरुळ लिंकरोड, आडगाव गावठाण, आडगाव मळे परिसर, कोणार्कनगर, नांदूर रोड, समर्थनगर, निलगिरीबाग, हनुमाननगर, नांदूरनाका, संभाजीनगर आणि नांदूर, मानूर परिसर
प्रभाग क्रमांक ३- लुंगे मंगल कार्यालय परिसर, आडगाव नाका, चव्हाण मळा, गणेशवाडी, जनार्दननगर, विजयनगर, साईनगर, मानेनगर, कळस्करनगर, अमृतधाम, गोपाळनगर, लक्ष्मीनगर, सरस्वतीनगर, तपोवन आणि परिसर
नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १५- काठे गल्ली, माणेकशानगर, शंकरनगर, टाकळी रोड, व्दारका परिसर, गोडेबाबानगर, समर्थनगर, मारुती वेफर्स, तिगरानिया रोड, प्रज्ञा सोसायटी कााॅलनी आणि परिसर











