May 28, 2026 11:43 pm

उसाच्या शेतातील ‘ते’ दृश्य पाहून सर्वच हादरले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

कोल्हापूरमध्ये ५५ वर्षीय विधवा महिलेचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. शेतात औषध फवारण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय छबूताई सर्जेराव पाटील यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला.

पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे रविवारी ही भयंकर घटना घडली. या प्रकरणाची पन्हाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास छबूताई पाटील या मासुलकी नावाच्या शेतावर उसावर औषध फवारणी करण्यासाठी गेल्या होत्या. पतीचे निधन झाल्याने आणि मुलगा बाहेरगावी असल्याने शेतीची सर्व कामे त्याच करत होत्या. तसेच गावातल्या घरी त्या एकट्याच राहत होत्या. रविवारी दारात घातलेलं वाळवण तसंच होतं आणि दरवाजा देखील बंद होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी चौकशी सुरू केली. मात्र, रात्री उशीर झाला तरी फोन उचलत नसल्याने पुतणे आणि नातेवाईकांनी छबूताई पाटील यांचा शोध सुरू केला.

छबूताई पाटील फोनही उचलत नसल्याने नातेवाईक चिंतेत आले. छबूताई या शेतात गेल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी शेतात जाऊन शोध सुरू केला. दरम्यान , नातेवाईकांना शेताच्या बांधावर औषधाने भरलेला पंप, चप्पल आढळले. त्यानंतर देखील पुतण्याने फोन केला. तेव्हा उसातून फोनचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तर शेताच्या मध्यभागी उसाच्या सरीत त्यांचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह आढळला.

छबूताई यांच्यावर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केले होते. खून करून चेहरा कापडाने झाकलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे अत्याचार करून खून केला आहे का? अशी उलटसुलट चर्चा परिसरात होतेय. तर या घटनेची माहिती मिळताच मुलाने केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. छबूताई यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!