May 28, 2026 11:41 pm

८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी, शूज आणि टी-शर्टच्या रंगावरुन आरोपी अटकेत

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बस थांब्यावर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणीसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला पिंपरी पोलिसांनी ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करुन बूट (शूज) आणि टी-शर्टच्या रंगावरुन अटक केली.चिंचवडेनगर येथून आरोपीला पकडण्यात आले आहे.

याप्रकरणी संबंधीत तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी माहिती दिली. फिर्यादी संबंधित २४ वर्षीय तरुणी २१ मे रोजी सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून निघाली होती. चिंचवडमधील मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बस थांब्यावर तरुणी कंपनीच्या बसची वाट पाहत उभी होती. बस थांब्यावर तरुणी एकटीच होती. काही वेळाने एक अनोळखी व्यक्ती तिथे आला. त्या व्यक्तीने संबंधित तरुणीकडे पाहत सार्वजनिक ठिकाणी अश्लिल वर्तन केले. तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर तेथून पळून गेला.

आरोपीचे नाव निष्प्नन नव्हते. त्याने पळून जाताना रस्त्याने कपडेही बदलले होते. त्यामुळे शोध घेण्याचे मोठे आव्हान होते. एम्पायर इस्टेट परिसरातील ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. आरोपीचा शूज आणि टी-शर्टचा रंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसला होता. त्याच्या आधारे त्याचा शोध घेतला. चिंचवडेनगर येथून त्याला ताब्यात घेतले आहे. ४८ तासात त्याला अटक केली असून पोलीस कोठडीत आहे. आरोपी ४३ वर्षांचा असून तो बाऊन्सर म्हणून काम करत आहे. प्राथमिक तपासात त्याच्यावर पूर्वीचा कोणताही गुन्हा दाखल नाही. त्याचा पूर्व इतिहास तपासला जात आहे. असा कोणताही प्रसंग असल्यास महिलांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. पोलीस नेहमीच महिलांच्या सुरक्षितेतसाठी सतर्क, तत्पर आहेत, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!