June 5, 2026 6:02 am

तर मी राष्ट्रवादी सोडणार; रोहित पवारांचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असून, राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत जाऊ शकतो अशी चर्चा अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झाली होती. अखेर बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आहे की नाही? यावर पक्षाच्या वरिष्ठांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. यावर अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

पक्षाचं विलिनीकरण होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या बैठकीला शरद पवार यांची देखील उपस्थिती होती, मात्र यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया त्यावेळी दिली नाही, परंतु शरद पवार यांच्यासमोरच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये बोलताना रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

विलिनीकरणाची चर्चा आता थंड झाली आहे, परंतु तरी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीये, तुम्ही एकटे सोडले तर राष्ट्रवादी शरद पवार गटातील इतर कोणताही नेता सरकारवर फार काही टीका करताना दिसत नाहीये, त्यामुळे लोकांना अजूनही असं वाटतं की मागच्या दाराने चर्चा सुरू आहे, समजा विलिनीकरण होऊन राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत गेला तर तुमची भूमिका काय असणार? असा प्रश्न यावेळी रोहित पवार यांना विचारण्यात आला होता.

या प्रश्नला उत्तर देताना रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. जर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलिनीकरण होऊन एनडीएसोबत गेला तर मी दुसरा पर्याय निवडेल, इतर पर्याय निवडेल पण भाजपसोबत जाणार नाही, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही काँग्रेससोबत जाणार का? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला, मात्र या प्रश्नावर बोलणं त्यांनी टाळलं. मी बघेल दुसरा पर्याय निवडेल परंतु मी भाजपसोबत जाणार नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!