June 5, 2026 6:51 am

पिंपरीचे महापौर रवी लांडगे यांना धमकी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांना मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला भोसरी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ताब्यात घेतले. पोलीस आयुक्तालयाच्या ‘समाधान’ हेल्पलाईनवर फोन करून धमकी देण्यात आली होती.

संबंधित व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक नसून नैराश्यातून त्याने ही धमकी दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला समज देऊन घरी सोडले आहे.

आशिष जमदाडे पाटील (रा. चिखली) असे फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो भोसरी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १९) दुपारी चारच्या सुमारास पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ‘समाधान’ हेल्पलाईनवर एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने महापौर रवी लांडगे यांना मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

समाधान हेल्पलाईनवर आलेल्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण आणि लोकेशन तपासण्यात आले. त्यानुसार, पोलिसांनी आशिष पाटील याचा चिखली परिसरातून शोध घेत त्याला ताब्यात घेतले. भोसरी पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने नैराश्येतून हा फोन केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडे तसेच तो राहत असलेल्या परिसरात चौकशी केली असता त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला कडक समज देत पुढील काळात अशा प्रकारचे कृत्य न करण्याचा इशारा दिला.

डाॅ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखासमाधान हेल्पलाईनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने महापौरांबाबत वक्तव्य केले. त्याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!