June 5, 2026 7:29 am

मृत चिमुरड्याच्या घट्ट मुठीत खाऊचं पाकिट, मृतदेह बाहेर काढताना गावकरीही हळहळले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

छत्रपती संभाजीनगरमधून माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ५ वर्षांच्या निष्पाप दिव्यांग चिमुरड्याची त्याच्याच जन्मदात्या आई-वडिलांनी गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे.

शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या या बालकाचे ओझे वाटू लागल्याने, पोटच्या गोळ्याचाच अत्यंत क्रूर अंत या निर्दयी माता-पित्याने केला. मंगळवारी हर्सूल-सावंगी बायपास परिसरातील एका शेतात या दुर्दैवी बालकाचा मृतदेह आढळून आला आहे.

या घटनेतील सर्वात हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी बाब म्हणजे, चिमुरड्याचा जीव घेण्यापूर्वी त्याला शांत करण्यासाठी मारेकरी पालकांनी त्याच्या हातात खाऊचं पाकीट दिलं होतं. मृत्यूच्या भयंकर वेदना सहन करतानाही, त्या निष्पाप जीवाने ते खाऊचे पाकीट हातामध्ये घट्ट पकडून ठेवलं होतं. पोलिसांनी जेव्हा शेतातील खड्ड्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढला, तेव्हा त्याच्या चिमुरड्या हातातील ते पाकीट तसंच होतं. घाटी रुग्णालयाच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून या हत्येची भयानक क्रूरता समोर आली आहे. बालकाचे नाक आणि तोंड दाबून त्याचा श्वास कोंडण्यात आला, तसेच त्याच्या डोक्यावर आणि पोटावर बोथट वस्तूने जोरदार मारहाण करून त्याला संपवण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!