May 15, 2026 12:00 pm

पुण्यावरून स्वतंत्र प्रवास अन् एकत्र दर्शन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भोंदू अशोक खरात प्रकरणाला जवळपास तीन महिने झाले आहेत. सुरुवातील या प्रकरणात अनेक राजकीय नेतेमंडळींची नावे समोर आली, परंतु रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आल्याने त्यांना राज्य महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला.

त्यानंतर रुपाली चाकणकर वारंवार सांगत आहेत की, त्या अशोक खरातला फक्त आध्यात्मिक गुरु मानत होत्या. मात्र अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे आर्थिक संबंध असल्याची चर्चा सध्या सुरू आहेत. या प्रकरणी ईडीकडून रुपाली चाकणकर यांची आज (14 मे) दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. मात्र त्याआधीच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकरणकर यांचा अशोक खरातसोबतचा गुवाहाटी येथील फोटो पोस्ट केला. यावर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

साडेआठ तासांच्या ईडी चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना फोटोबाबत विचारले असता रुपाली चाकणकर म्हणाल्या की, पहिली गोष्ट म्हणजे गुवाहाटीचा जो फोटो समोर आला आहे, त्या फोटोमध्ये माझ्या कुटुंबासोबत खरातचं कुटुंब आहे. दुसरी गोष्ट आम्ही खरातसोबत प्रवास केलेला नाही. खरात त्याच्या कुटुंबासोबत आणि ट्रस्टींसोबत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी तिथे गेला होता. यापूर्वी माझ्या कुटुंबाने कधीही कामाख्या देवीचे दर्शन केलेलं नव्हतं. त्यामुळे त्यावेळचा आमचा भाव असा होता की, आपल्याला जर आपल्या गुरुबरोबर दर्शन करता आलं, तर तो अध्यात्मिक भाव म्हणून आम्ही स्वतंत्र पुण्यावरून प्रवास करून गेलो होतो. तिथे सोबत आम्ही दर्शन घेतलं होतं. त्यानंतर खरातने त्याच्या लोकांसोबत प्रवास केला, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आपण अनेक ठिकाणी दर्शनाला जातो, तो एक अध्यात्मिक भाव असतो. पण 17 तारखेला अटक झाल्यानंतर समजलं की, खरात आरोपी आहे. तोपर्यंत खरं तर आपण पाहत आहोत की, अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर त्याला गुरू मानत होते आणि दर्शनासाठी जात होते. तीच आमची भावना होती. एक प्रामाणिक श्रद्धा आम्ही ठेवली होती आणि तो एक श्रद्धेचा भाव होता, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!