May 14, 2026 5:02 pm

गडकरींनीही वाहनांचा ताफा सोडला : बसने प्रवास करत केली पालखी मार्गाची पाहणी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज (ता. १४ मे) हडपसर ते फलटण पालखी मार्गाची पाहणी केली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी केवळ तीन गाड्या दिमतीला हेात्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनुसार गडकरी यांनी आपल्या वाहनांचा ताफा बाजूला ठेवून बसने प्रवास करत पालखी मार्गाची पाहणी केली. फलटणमध्ये दुपारचे भोजन करून ते पुढेही पंढरपूरपर्यंतही बसने प्रवास करूनही पालखी मार्गाची पाहणी करणार आहे.

नितीन गडकरी यांच्यासमेवत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे नीरा (ता. बारामती), माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, फलटणचे आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटणमध्ये सहभागी झाले होते.

इराण-अमेरिका युद्धामुळे सध्या इंधन टंचाई, महागाई वाढली आहे, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचतीचे आवाहन केले आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाची पाहणी करताना सर्व ताफा बाजूला ठेवून बसने पालखी महामार्गाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार गडकरी यांनी बसने प्रवास केला.

गडकरी यांनी फलटणमध्ये बोलताना संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी महामार्गाची सद्यस्थिती सांगितली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले,. याच पालखी मार्गावर जेजुरीत बायपास करण्याचे ठरले होते. मात्र, स्थानिकांच्या विरोधानंतर जेजुरीत आता उड्डापणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, फलटणमधील विविध विकास कामांसाठी ९७ कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा केली आहे. फलटणमध्ये भोजनानंतर पंढरपूरपर्यंत बसने प्रवास करून पालखी मार्गाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे मोदींच्या घोषणाचे गडकरी यांनी तंतोतंत पालन केल्याची दिसून आले.

नितीन गडकरी यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील सहभागी झाले होते. तसेच फलटणमध्ये आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गडकरींचे स्वागत केले.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!