May 14, 2026 8:56 am

वसई विरार महानगरपालिका आता मैला प्रक्रिया प्रकल्प उभारणार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वसई-विरार शहरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर महानगरपालिकेला अनेकवेळा नगरसेवकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घेरले असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी प्रक्रिया न करताच खाडीत सोडल्या जाणाऱ्या मैल्यावर आता प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी प्रकल्प उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नवघर येथील सहा एकर जागेत हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी जवळपास ७ ते ८ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

वसई-विरार शहरात सुमारे २२५ किलोमीटर लांबीची गटारे असून त्यावर १ लाखांहून अधिक झाकणे आहेत. मात्र, प्लास्टिक कचरा आणि साचलेल्या गाळामुळे पावसाळ्यात ही गटारे तुंबतात, ज्यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते. यापूर्वी आधुनिक यंत्रसामग्रीच्या अभावामुळे काढलेला गाळ रस्त्याच्या कडेला किंवा लोकवस्तीत टाकला जात असे, ज्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत होते.

तर दुसरीकडे खाडी पात्रात ही मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वसई विरार महापालिकेने आधुनिक यंत्राचा वापर करून स्वच्छता करण्यावर भर दिला आहे. यापूर्वी गटार किंवा शौचालयांच्या टाक्यांमधील गाळ थेट खाडीत सोडला जात असल्याच्या तक्रारी होत्या. आता मैला प्रक्रिया प्रकल्पाद्वारे (एफएसटीपी) त्यावर प्रक्रिया करूनच तो विसर्जित केला जाणार आहे.

या प्रकल्पासाठी महापालिकेने नवघर येथे सहा एकर जागा शोधली असून त्यावर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यात’डिझाइन, बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर’ तत्त्वावर ‘मैला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ (एफएसटीपी) उभारला जाईल.या प्रकल्पाचे बांधकाम, कार्यान्वयन, तसेच त्याचे संचालन आणि देखभाल संपूर्ण ७ वर्षासाठी मे.आर एन बी इन्फ्रा यांना ठेका दिला आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण करून प्रकल्प कार्यान्वित करण्यात यावा अशा सूचना संबंधित ठेकेदाराला केल्या आहेत.

गटारातील निघणारा गाळ आहे त्यावर प्रक्रिया करण्यासाठी एफएसटीपी प्रकल्प उभारला जाणार आहे. नवघर येथे जागा शोधली आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू होईल.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!