May 13, 2026 10:27 pm

नवीन ठाणे रेल्वे स्थानकाचे काम का रखडले होते, आता खर्च किती?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे आणि मुलुंड या दोन महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान नवीन रेल्वे स्थानक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी या प्रकल्पाचे काम अनेक वर्ष रखडलेले होते.

या प्रकल्पासाठी अंदाजे २४५ कोटी रुपये इतका खर्च होणार आहे. हा प्रकल्प सुरुवातीला १२० कोटी रुपयांचा होता. मंजुरी मिळाल्यानंतर आता किती वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण होणार याबाबत प्रश्चचिन्ह आहेत. असे असले तरी नवीन स्थानक सुरु झाल्यास जुन्या ठाणे रेल्वे स्थानकातील मोठा भार हलका होणार आहे. नवीन स्थानकामुळे काय होणार, का रखडले होते याबाबत वाचा…

ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकात मध्य रेल्वेची मुख्य मार्गिका, ट्रान्स हार्बर (ठाणे ते पनवेल, वाशी, नेरुळ) आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबतात. या स्थानकात जलद आणि धिम्या या दोन्ही उपनगरीय रेल्वेगाड्यांना थांबा असल्याने तसेच ट्रान्स हार्बर, लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे कळवा, मुंब्रा, मुलुंड, नाहुर, भांडुप भागातील प्रवासी देखील ठाणे स्थानकात प्रवासासाठी येतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील ताण वाढला आहे. रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन, चार, पाच, सहा यावर नेहमी प्रवाशांची सकाळी आणि रात्रीच्या वेळेत तुफान गर्दी असते.

ठाणे स्थानकातील प्रवाशांचा भार हलका व्हावा यासाठी ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानका दरम्यान नवीन स्थानक उभे राहावे अशी मागणी सुरु होती. त्यानुसार, ‘स्मार्ट सिटी मिशन” अंतर्गत ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक मंजूर करण्यात आले. ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडने त्यांच्या जवळपास ६० टक्के भागाचे काम पूर्ण केले होते. परंतु भारतीय रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामास विलंब होत असल्याचा आरोप होत होता. रेल्वे भागाचा खर्च आणि काम रेल्वे मंत्रालय करेल हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही. सूचनांअभावी ते काम सुरू करू शकत नव्हते. त्यामुळे अंदाजे १२० कोटींचा हा प्रकल्प आता २४५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा झाला. अखेर या प्रकल्पाच्या निर्माणास केंद्राची मंजुरी मिळाल्याचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या समाजमाध्यमावर प्रसारित केले. त्यामुळे आतातरी या प्रकल्पास गती येईल का, असा प्रश्न पडला आहे.

नवीन रेल्वे स्थानक हे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ आहे. हा भाग पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पूलापासून काही मिनीटांवर आहे. तर सध्याचे ठाणे स्थानक हे या भागापासून १० ते १५ मिनीटांच्या अंतरावर आहे.

त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नवीन रेल्वे स्थानकातून प्रवास करणे सोयीचे ठरेल. वागळे इस्टेट, मुलुंड चेकनाका, रहेजा गार्डन भागातील नागरिकांनाही हे नवे स्थानक काही अंतरावर असेल. वागळे इस्टेट भागात आयटी कंपन्या, लघु उद्योग आहेत. परिवहन सक्षम असेल तर येथील नोकरदारांनाही हे स्थानक लवकर गाठता येईल.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!