३१ व्या गांधी दर्शन शिबिरात रविवार दि. १० मे रोजी सकळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत दोन विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महिला आरक्षण, डिलिमिटेशन विधेयक आणि घटनादुरुस्ती’ या विषयावर ज्येष्ठ घटनातज्ञ प्रा.उल्हास बापट यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच ‘अस्थिर जग आणि आपण’ (पश्चिम आशिया, रशिया-युक्रेन व पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्ध) या विषयावर ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक जतीन देसाई (मुंबई) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
यानंतर महात्मा जोतीबा फुले यांचावरील चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे. ही दोन्ही व्याख्याने व चित्रपट विनामूल्य आहेत. याचे संयोजन महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी केल्याची माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिली.
यासाठी संपर्क – सुरज कुलकर्णी – 93268 82000, युक्रांदचे पुणे शहर संघटक तेजस भालेराव – 91724 87019 आणि गांधी दर्शन शिबिराचे समन्वयक गणेश गाढवे – 96579 49574 यांच्याशी संपर्क करावा असे संयोजकानी कळवले आहे.











