May 14, 2026 8:57 am

कोल्हापुरात वडिलांसह मामाकडून अत्याचार, तर बीडमध्ये भावाकडून मामेबहीणसोबत धक्कादायक कृत्य

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये 65 वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या मुलीला गायीच्या गोठ्यात लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिची निघृर्ण हत्या करण्यात आली.

याघटनेमुळे महाराष्ट्र पेटून उठला आहे. ही घटना ताजी असताना पुण्यातील पर्वती भागामध्ये 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 50 वर्षी आजोबांनीच नातीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या दोन घटनेनंतर कोल्हापूर आणि बीडमधील नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलींवर वाढत असलेल्या अत्याचाराच्या या घटनांमुळे महाराष्ट्राला हादरून सोडलंय.

कोल्हापुरात जन्मदात्या बापाने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच उघड झालं आहे. मुलगी 9 वर्षांची असल्यापासून तिच्यावर वडिलांकडून अत्याचार होत होता. धक्कादायक म्हणजे मामा आणि मामेभावानं देखील गेल्या 5 वर्षांपासून तिचं लैंगिक शोषण केलंय. ही पीडित मुलगी अल्पवयीन असून तिचं आता वय 15 वर्षांचं आहे. मुलीने आईला झालेल्या गोष्टी सांगितल्यावर आईने मुलीला घेऊन घर सोडलं आणि शाहूपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन शाहूपुरी पोलिसांनी आरोपी बाप आणि मामाला अटक केली.

तर बीडमधील केज तालुक्यातही संतापजनक घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाच्या गावाला आलेल्या 29 वर्षीय भाच्याने मामाच्या मुलीवर लैंगिक शोषण केलं आहे. या घटनेने संपूर्ण बीडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मामा-मामी रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेल्याचे हेरून आत्येभावाने घरात एकटी असलेल्या 10 वर्षाच्या मामेबहि‍णीवर लैंगिक अत्याचार केला. या विकृतीनंतर आत्येभाऊ घरातून पळून गेला. आई – वडील घरी आल्यावर मुलीने त्यांना झालेल्या कृत्याबद्दल सांगितलं. पालकांनी लगेच पोलीस स्टेशन गाठत भाच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी या नराधम भावाला अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काय देशातील या मुलींवरील अत्याचाराचा घटना ज्याप्रकारे समोर येत आहेत. त्यात मुली आपल्या घरात काय नातेवाईकांमध्येही सुरक्षित नाही का? असा प्रश्न उपस्थितीत होतो आहे. घराबाहेरच्या नराधम सोडा इथे घरातील या विकृत मानसिकतेशी आपल्या लेकींना कसं सुरक्षित ठेवायचं असा प्रश्न पालकांना पडला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!