May 14, 2026 11:53 am

शिक्षीका असलेल्या आईसह उच्चशिक्षित विवाहीत मुलगीने घेतला गळफास

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

गळफास घेऊन माय-लेकीच्या आत्महत्या प्रकरणी अखेर मुलीचा पती,सासू, सासरे, नणंद अशा पाच जणांवर मुलगाच हवा यासोबतच संपत्ती, हुंड्यासाठी शारीरिक,मानसिक छळ केल्याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

समाजमन सुन्न करणारी ही थरारक घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेशनगरमध्ये नुकतीच घडली.

संगीता श्रीराम ढबाले (वय ५२) आणि त्यांची मुलगी आकांक्षा लोकेश ब्रह्मे (वय २९, रा. ओमनगर, सक्करदरा) अशी मृतांची नावे आहेत. संगीता या शिक्षिका होत्या. आकांक्षाचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले असून त्या गृहिणी होत्या.

पती लोकेश हे देखील अभियंते आहेत. दोन महिन्यांपूर्वी प्रसूतीनंतर आकांक्षा यांचे बाळ दगावले. याचा जबर धक्का तिला बसला. संगीता या आकांक्षा यांना घरी घेऊन आल्या, बाळ दगावल्याने आकांक्षा या नेहमी तणावात राहू लागल्या. मुलगी मानसिक धक्क्यात असल्याने संगीताही अस्वस्थ होत्या.

गुरुवारी रात्री दोघींनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी लोकेश यांनी मोबाईलवर संपर्क साधला मात्र दोघींनी फोन उचलला नाही. अखेर लोकेश व त्यांचे नातेवाईक व्यंकटेशनगर येथील संगीता यांच्या घरी आले. दार बंद होते.

प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीतून पाहिले असता दोघीही गळफास घेत आत्महत्या केलेल्या स्थितीत होत्या. पोलिसांनी व्यंकटेशनगर येथील घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान, एका नागरिकाने नंदनवन पोलिसांना माहिती दिली. आत्महत्येपूर्वी दोघींनी आम्ही स्वखुशीने आत्महत्या करीत आहोत’, असे चिठ्ठीत म्हटले आहे. ‘माझा अंत्यविधी मौद्यातील मूळ गावी करण्यात यावा, कोणाचीही तक्रार नाही’, असे आकांक्षा यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. अखेर भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लोकेश, सुधाकर, अनसूया ब्रम्हे आणि इतर दोघे अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!