May 14, 2026 3:03 pm

“डॉल्बीवाल्या बोलव माझ्या.”, घरच्या लग्नाच्या वरातीत अजय-अतुलचा जबरदस्त डान्स!

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भारतीय चित्रपटसृष्टीतील अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी संगीतकार जोडी म्हणून अजय-अतुल यांना ओळखलं जातं. अजय व अतुल गोगावले हे सख्खे भाऊ आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील ‘सैराट’, ‘वेड’ या गाजलेल्या सिनेमांपासून ते हिंदीतील ‘अग्निपथ’, ‘धडक’ या चित्रपटांना अजय-अतुल यांचं संगीत लाभलं आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाला सुद्धा अजय-अतुल यांनीच संगीत दिलं आहे.

अजय-अतुल यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकताच त्यांचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी आजवर अजय-अतुल यांचे म्युझिक स्टुडिओमधील किंवा लाइव्ह कार्यक्रमात परफॉर्मन्स सादर करतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण, नुकताच त्यांचा लग्नाच्या वरातीत डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

अजय-अतुल यांचा हा डान्स व्हिडीओ त्यांच्या Samrudhi Thopte आणि त्यांच्या फॅनपेजनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अजय-अतुल लग्नाच्या वरातीत डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. समृद्धीने हा व्हिडीओ शेअर करत याला, “अजय-अतुल जेव्हा स्वत:च्या गाण्यांवर घरच्या लग्नाच्या वरातीत डान्स करतात” असं कॅप्शन दिलं आहे.

या व्हिडीओमध्ये अजय आणि अतुल हे दोघंही भन्नाट एनर्जीसह डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला त्यांनी “डॉल्बीवाल्या बोलव माझ्या डीजेला…” या गाण्यावर ठेका धरला होता. तर, व्हिडीओमध्ये पुढे अतुल आणि त्याचा मुलगा मल्हार गोगावले हे दोघंही “झिंगाट…” गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. अजय-अतुलच्या ‘झिंगाट’ गाण्याने तर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र धुमाकूळ घातला होता. हे ‘सैराट’ सिनेमातील गाणं आज १० वर्षांनीही सर्वत्र लोकप्रिय आहे.

नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “मी हे कायम सर्वांना सांगेन की, अजय-अतुलचं कौतुक कराल तेवढं कमीच आहे…आणि ते मराठी आहेत… महाराष्ट्रातले आहेत हे आपलं भाग्य आहे”, “स्वत:च्या गाण्यांवर डान्स करण्याची एक वेगळीच मजा आहे”, “साक्षात अजय-अतुल On Beats”, “गणपती डान्स Vibes”, “अप्रतिम जे अजय-अतुल पूर्ण जगाला त्यांच्या गाण्यावर नाचवतात ते सुद्धा स्वतःच्या संगीतावर नाचताहेत खूप सुंदर”, “नादखुळा फायर डान्स” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘राजा शिवाजी’नंतर आता अजय-अतुल ‘राणाबाली’ या तेलुगू सिनेमाच्या संगीताची जबाबदारी सांभाळणार आहेत. यामध्ये विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा ११ सप्टेंबर २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!