पुण्यातील कात्रज ते सिंहगड हा सात ते आठ तासाचा आणी चोदा ते पंधरा लहान मोठ्या टेकड्या आसणारा अवघड ट्रेक नांदेडसीटीतील रनर्स ह्या ग्रुपने ०१ मे २०२६ ह्या दिवशी महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत पुर्ण केला.
ह्या ट्रेक मधे दहा वर्षाच्या मुलापासून ते त्रेसष्ट वर्षाच्या वृद्धांपर्यंत अशा वेगवेगळ्या वयातील गिर्यारोहकांनी भाग घेतला. ह्यामधे बरीच मुले आणी महिलांचा सहभाग ह्या मोहिमेचं आकर्षण ठरलं.एकुण त्रेचाळीस गिर्यारोहक ह्या मोहिमेत होते.हा ट्रेक विशेषता पौर्णिमेच्या रात्री चांदण्यात पुर्ण करण्याला लोक पसंती देतात.
ह्या साठी गेले दोन महिने वेगवेगळ्या टेकड्यांवर जावून सराव करण्यात आला.
ह्यासाठी नांदेडसीटी रनर्स ग्रूपचे सभासद श्री.महेश तोडकर,श्री.संतोष गुरव आणी श्री अजिंक्य पोवार यानी पुढाकार घेवून ह्या ट्रेकचे आयोजन केले तसेच सदर सभासदांनी गेले दोन महिने बाकी गिर्यारोहकांकडून सराव करून घेतला. ट्रेक पुर्ण केल्यानंतर प्रतेक गिर्यारोहकाला मेडल देण्यात आले.
ट्रेक पुर्ण केल्यावर सर्व गिर्यारोहकांचा आनंद गगनात मावत नव्हता,आसं ह्या ट्रेकचा भाग आसलेले हवाई दलातील माजी आधिकारी ज्ञानेश्वर सोळसकर यांनी सांगीतले.











